मालट्रकची पोलीस वाहनाला धडक
By Admin | Updated: April 6, 2017 16:31 IST2017-04-06T16:31:55+5:302017-04-06T16:31:55+5:30
पंचवटी : मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाच्या पुढील बाजूस भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने आडगाव पोलीस वाहनाला धडक दिल्याची घटना गुरूवारी (दि.६) रोजी पहाटेच्या सुमाराला घडली आहे.

मालट्रकची पोलीस वाहनाला धडक
पंचवटी : मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाच्या पुढील बाजूस भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने आडगाव पोलीस वाहनाला धडक दिल्याची घटना गुरूवारी (दि.६) रोजी पहाटेच्या सुमाराला घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताप्रकरणी उत्तरप्रदेशातील ट्रकचालक विजयप्रकाश विश्वकर्मा याच्या विरूद्ध आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.