शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

 ट्रकची टेम्पोला धडक : एकाच कुटुंबातील दोन्ही महिलांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 16:22 IST

ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला

ठळक मुद्देपालवे कुटुंबावर शोककळाकुटुंबातील सहा सदस्य जखमीगिरणारे-धोंडेगाव रस्त्यावर भीषण अपघात

नाशिक: गिरणारे-धोंडेगाव रस्त्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मालवाहु ट्रकने समोरुन येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंगाम्हाळुंगी येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यु झाला तर पाच प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरणारे-धोंडेगाव रस्त्याने बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पालवे कुटुंबिय त्यांच्या टेम्पोत (एम.एच१५ एफ.यु ९३६३) बसून गिरणारेकडून गंगाम्हाळुंगीच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी हरसुलच्या दिशेने गिरणारेकडे माती वाहून नेणारा अवजड ट्रक (एम.एच.०४ डीडी९०७०) भरधाव जात होता. ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. यावेळी टेम्पोतील महिला, पुरुष बाजूला फेकले गेले. रात्रीच्या अंधारात कोण कुठे जाऊन पडले, हे कोणालाही कळत नव्हते. यावेळी आजुबाजुच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना तत्काळ खासगी वाहनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले. तसेच रुग्णवाहिकांशी संपर्क साधून अपघातस्थळी मदत देण्याची मागणी केली. काही वेळेत रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहचल्या. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी उपचार सुरु असताना रात्रीच्या सुमारास निर्मला जनार्दन पालवे (३०) तर गुरुवारी सकाळी रेखा उर्फ पुनम वाल्मिक पालवे (३५,दोघी, रा.गंगाम्हाळुंगी) यांचा मृत्यु झाला. तसेच टेम्पोचालक बाळु अर्जुन पालवे (३८), यशवंत काशिनाथ पालवे (४०), यमुना श्रावण पालवे (३०), भागाबाई भगवान पालवे (३०), तुळसाबाई तुळशीराम पालवे (४०), शिलाबाई देवानंद पालवे (४०,सर्व रा. गंगाम्हाळुंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला असून त्याच्यावरिुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.--- 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यूTrafficवाहतूक कोंडीWomenमहिला