अमृतधामजवळ ट्रकच्या धडकेत चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:13 IST2018-04-11T00:13:01+5:302018-04-11T00:13:01+5:30

अमृतधामजवळ ट्रकच्या धडकेत चालक ठार
नाशिक : ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत जखमी झालेला सोलापूर जिल्ह्यातील ट्रेलरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़८) मध्यरात्रीच्या सुमारास अमृतधाम चौफुलीजवळ घडली़ विठ्ठल नारायण लोखंडे (२५, रा़ सोलापूर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे़
विठ्ठल लोखंडे हा ट्रेलरचालक ओझरकडून नाशिककडे येत होता़ अमृतधाम चौफुलीजवळील या ट्रेलरने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली़ यामध्ये ट्रेलरचालक लोखंडे याच्या डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाला़