ट्रकचालकाला लुटणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:21+5:302021-02-05T05:38:21+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिन्नर एमआयडीमधून ट्रकचालक सिराजउद्दीन अलिहुसेन खान रविवारी रात्री दीडच्या सुमारास सहकारी राजूसह ट्रकने (एमएच- ...

Truck driver arrested | ट्रकचालकाला लुटणारा ताब्यात

ट्रकचालकाला लुटणारा ताब्यात

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिन्नर एमआयडीमधून ट्रकचालक सिराजउद्दीन अलिहुसेन खान रविवारी रात्री दीडच्या सुमारास सहकारी राजूसह ट्रकने (एमएच- ४८ बीएम- ३३०) काच बनविण्याचे कच्चे साहित्य घेऊन आगर टाकळी गावातून गोदावरी पुलावरून जात होते. दोन अज्ञात इसमांनी दगड घेऊन त्यांचा धाक दाखवत ट्रक थांबविला. एन्ट्री निकाल असे म्हणत ट्रकचालकाला मारहाण करत त्याचा सहकारी राजूच्या खिशातून सहाशे रुपये काढून घेतले. उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस नाईक समीर चंद्रमोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने आगर टाकळी येथील समतानगरमधून राहुल शांताराम जावरे (२२) व कुणाल पांडुरंग बिरार (१९) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अटक करून सहाशे रुपये जप्त केले आहेत.

Web Title: Truck driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.