ट्रकचा धक्का, स्मारकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:56 IST2020-05-27T22:16:17+5:302020-05-27T23:56:51+5:30
नांदगाव : धक्का मारून सुरु करण्याच्या नादात अचानक सुरू झालेल्या ट्रकचा धक्का लागून जुन्या तहसील कार्यालयाजवळ ज्येष्ठ नागरिकांनी बांधलेले अमर जवान स्मारक पडल्याची घटना घडली. वाहनाचा धक्का लागून स्मारक पडण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकाकडे धाव घेऊन नाराजी व्यक्त केली.

‘स्वच्छ नांदगाव, सुंदर नांदगाव’चा ध्यास घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी २० वर्षापूर्वी पदरमोड करून तालुक्यातून शहीद झालेले जवान व सैनिकांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने ‘अमर जवान स्मारक’ बांधले होते. त्यावर भारताचा नकाशा, बंदूक, मशाल व हॅट असे शिल्प आहे.
औरंगाबाद, मालेगाव व येवला रस्त्याच्या टी आकाराच्या रस्त्यावर
ते आहे. ते बांधण्यासाठी जायंट्स ग्रुपचेही योगदान लाभले आहे. प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक
व जायंट्सचे सदस्य येथे
जमून झेंडावंदन करतात. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंके, विधिज्ञ गुलाबराव
पालवे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज आदींनी घटनास्थळी
भेट दिली.