घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 09:16 PM2021-10-17T21:16:11+5:302021-10-17T21:16:11+5:30

मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Truck collides near Ghodegaon, Talwade's Ism killed | घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार

घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार

Next
ठळक मुद्देजखमी महिलेस खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले

मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील तळवाडे येथील मौलाना अफजल हे मनमाड येथे दावतनगर भागात इमाम म्हणून काम करीत होते. मालेगावी ते साडूकडे मुलांना सोडण्यासाठी आले होते. तेथून पत्नीसह मनमाडकडे परत जाताना घोडेगाव चौकीच्या पुढे जळगाव चोंढीनजीक पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले, तर पत्नी गंभीर जखमी झाली.

मौलाना तौसिफ यांचा फोन आल्याने सामाजिक कार्यकर्ते शफीक ॲन्टिकरप्शन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मनमाड येथेही कळविण्यात आले. जखमी महिलेस खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Truck collides near Ghodegaon, Talwade's Ism killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app