भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:12 IST2020-08-29T23:20:51+5:302020-08-30T01:12:42+5:30
नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनर उभा होता. यावेळी मागून येणारा भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला.

भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून चालक ठार
नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनर उभा होता. यावेळी मागून येणारा भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला.
गुरुवारी (दि.२७) रात्री ११ वाजेच्या सुमारास मुंबईनाका येथील एका पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलावर हा अपघात झाला. नाशिकहूून मुंबईकडे जाणारा ट्रक (एमएच ०४ डीके ५०५१) महामार्गावर नादुरुस्त कंटेनरवर (एचआर ५५ एई ६७८२) मागून जाऊन आदळला. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. याप्रकरणी कंटेनरचालक रविकांत शितलाप्रसाद शुक्ला (४७, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत ट्रकचालकाचो अंदाजे वय ३५ असून, ओळख पाठविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शुक्ला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.