शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
4
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
5
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
6
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
7
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
8
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
9
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
10
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
11
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
12
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
13
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
14
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
15
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
16
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
17
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
18
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
19
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
20
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना मनस्ताप : नव्या नॉबच्या सिलिंडरला बसेना जुना रेग्युलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:55 IST

रात्रीच्या सुमारास सिलिंडर संपल्यास महिलावर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण रात्री स्वयंपाकगृहातील कारभार ठप्प पडतो, कारण रात्री वितरकांकडून कारागीरदेखील उपलब्ध करून दिला जात नाही.

ठळक मुद्देव्या नॉबच्या सिलिंडरवर रेग्युलेटर काहीही करून बसत नाहीतोडगा काढणार कोण?

नाशिक : शहर व परिसरातील नागरिकांना सध्या स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर वापरताना एक नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांकडून अचानकपणे नवे नॉब असलेले गॅस सिलिंडर पुरविले जात असल्याने ग्राहकांकडे असलेले जुने रेग्युलेटर त्या सिलिंडरवर सहजासहजी योग्यरित्या बसत नसल्यामुळे ग्राहकांना डोकेदुखीसोबत धोकाही वाढला आहे. या समस्येविषयी वितरकांकडे अनेकदा तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलिंडरची सर्व सुरक्षा रेग्युलेटरवर अवलंबून असते. रेग्युलेटर योग्यपणे बसविला गेला नाही किंवा त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्यास गॅसगळती होऊन स्फोट होऊन आग लागण्याचा धोकाही उद्भवू शकतो. नव्या नॉबच्या सिलिंडरवर रेग्युलेटर काहीही करून बसत नाही. त्यामुळे वितरकांशी संपर्क साधून नागरिकांना अवेळी कारागिरांची मदत घ्यावी लागते. स्वयंपाकघरातील सिलिंडर कधीही संपत असल्यामुळे राखीव सिलिंडरला रेग्युलेटर लावणे हे ‘दिव्य’ ठरत आहे. रात्रीच्या सुमारास सिलिंडर संपल्यास महिलावर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण रात्री स्वयंपाकगृहातील कारभार ठप्प पडतो, कारण रात्री वितरकांकडून कारागीरदेखील उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.तोडगा काढणार कोण?विविध कंपन्यांच्या वितरकांकडून केल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठ्यादरम्यान नव्या नॉबच्या सिलिंडर आणि ग्राहकांकडे असलेले जुने रेग्युलेटर यांचे समीकरण जुळविण्यासाठी तोडगा काढण्याची गरज आहे. कारण सिलिंडरच्या नव्या नॉबचा आकार हा काहीसा अधिक असल्यामुळे कारागिरदेखील ग्राहकांना जेव्हा अशा सिलिंडरवर रेग्युलेटर बसवितात त्यावेळी नॉबला घासून घेतात; मात्र जेव्हा सिलिंडर संपते तेव्हा ग्राहकांची रेग्युलेटर काढताना पुन्हा दमछाक होते.कुणाची म्हैस अन् कुणाला उठबैसगॅस सिलिंडरचा नॉबची समस्या हा कंपन्यांचा प्रश्न जरी असला तरी त्याचा मनस्ताप मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ग्राहकांना गॅस नोंदणीच्या वेळी रेग्युलेटरचा एकदाच पुरवठा केला जातो, त्यामुळे नवे रेग्युलेटर ग्राहक पुन्हा खरेदी करू शकत नाही. नवे नॉब असलेल्या सिलिंडरला रेग्युलेटर सहजरित्या न बसणे यास ग्राहक जबाबदार नसून कंपन्या जबाबदार आहे; मात्र गैरसोय ग्राहकांची होत असल्याने कुणाची म्हैस अन् कुणाला उठबैस अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकconsumerग्राहक