त्र्यंबकच्या निरंजनी आखाड्यातर्फे कोरोना योद‌्ध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:18 AM2020-12-22T00:18:02+5:302020-12-22T00:25:07+5:30

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संक्रमण काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आणि समाजात जनजागृती करणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार व शासकीय यंत्रणेतील घटकांचा श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Triumph's Niranjani Arena honors Corona Warriors | त्र्यंबकच्या निरंजनी आखाड्यातर्फे कोरोना योद‌्ध्यांचा गौरव

त्र्यंबकच्या निरंजनी आखाड्यातर्फे कोरोना योद‌्ध्यांचा गौरव

googlenewsNext
ठळक मुद्दे सर्व कोरोनायोद्धांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जनसेवा केली,

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संक्रमण काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आणि समाजात जनजागृती करणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार व शासकीय यंत्रणेतील घटकांचा श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

निरंजनी आखाड्यात झालेल्या या गौरव सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महामंडलेश्वर रघुनाथ महाराज फरशीवाले बाबा, श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद सरस्वती महाराज, धनंजयगिरी महाराज ठाणापती निरंजनी आखाडा , केशवानंद सरस्वती महाराज, रामानंद सरस्वती महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था व श्रीराम शक्तिपीठ संस्थान यांच्या वतीने जिल्हा उपरुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगर परिषद , पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गोपनीय विभाग नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर कॉलेज, पत्रकार या घटकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कोरोनाकाळात सर्व कोरोनायोद्धांनी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जनसेवा केली, हे पुण्याचे कार्य असल्याने या सर्वांचा उचित सन्मान करणे आपले कर्तव्य असल्याचे गौरवोद‌्गार महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी याप्रसंगी काढले. यावेळी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था व श्रीराम शक्तिपीठ संस्थांचा भक्तपरिवार उपस्थित होता.

Web Title: Triumph's Niranjani Arena honors Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.