सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भुमिपुजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल येत्या २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता देवमामलेदारांच्या स्मारकाच्या भुमिपुजन समारंभास उपस्थित रहाणार आहेत. नियोजित स्मारकस्थळी भुमिपुजन सोहळा संपन्न झाले नंतर नजीकच असलेल्या दगाजी सिनेमा पॅलेस येथे मुख्यसमारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कोवीडच्या पार्श्वभुमीवर या सिनेमा पॅलेस मध्ये मोजक्याच मान्यवर नागरीकांना प्रवेश देणेबाबत पालिका प्रशासनाला सुचित करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( दि. १८) बागलाणचे प्रातांधिकारी विजयकुमार बांगर, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उबाळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. बांगर वीज वितरण उपविभागीय अभियंता मधुकर बोरसे आदीनीं प्रत्यक्ष स्मारक परिसर, तसेच समारंभस्थळाची पहाणी केली.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हेलिकॉप्टर ने आगमन होणार असुन हेलिपॅड स्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्यात. तसेच त्यांच्या सोबत येणारे मान्यवर अधिकारी स्वागत, निवास, भोजन आदीबाबत विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सटाण्यात राज्यपालांच्या दौऱ्याची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:12 IST
२८ रोजी आगमन : देवमामलेदारांच्या स्मारकाचे भूमिपूजन
सटाण्यात राज्यपालांच्या दौऱ्याची जय्यत तयारी
ठळक मुद्देदगाजी सिनेमा पॅलेस येथे मुख्यसमारंभाचे आयोजन