सटाण्यात राज्यपाल दौऱ्याची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:18+5:302021-02-05T05:47:18+5:30
यासंदर्भात माहिती देताना नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त ...

सटाण्यात राज्यपाल दौऱ्याची जय्यत तयारी
यासंदर्भात माहिती देताना नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खा. सुभाष भामरे, आ.जयकुमार रावल,आ. दिलीप बोरसे यांचे सकाळी १० वाजता शहरात आगमन होत आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा शासकीय दौरा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे.
स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच पुरोहितांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्यपाल कोश्यारी यांना माहिती देण्यासाठी हिंदी, मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेल्या पाच व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून ते मान्यवरांना स्मारकाविषयी माहिती देणार आहेत. दगाजी सिनेमा पॅलेस येथे होणाऱ्या समारंभस्थळी राज्यपालासांठी खास ग्रीन रूम बनविण्यात आली आहे. तर शासकीय विश्रामगृह चिनार हे कमी पडत असल्याने त्या ठिकाणीदेखील तीन ग्रीन रूम बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यांची डागडुजी युध्दपातळीवर करण्यात येत असून शहरातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे. राज्यपाल व मंत्री येणार असल्याने सटाणा-देवळा रस्त्यावर दोन हेलिपॅड उभारण्यात येत आहेत. राज्यपालांच्या दौरा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे. त्यांनी केलेल्या सूचनांचे पालिका प्रशासन व देवस्थानने तंतोतंत पालन करून पालिका प्रशासनाने दौरा यशस्वीतेसाठी कंबर कसली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली आहे.