निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:01 IST2019-07-04T19:01:11+5:302019-07-04T19:01:41+5:30

त्र्यंबकेश्वर : मविप्र समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर येथील, कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धुळे येथील निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना धुळे येथील  निसर्गमित्र समितीच्या वतीने सन्मानित सन्मानित करण्यात आले.

Trishankeshwar College's achievement in nature-friendly state competition | निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे यश

निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे यश

 निसर्गमित्र समितीच्या वतीने पर्यावरण विषयावर सामान्यज्ञान, रंगभरण व निबंधस्पर्धेचे आयोजन केले होते. या राज्यस्तरावरील स्पर्धेत प्रथम आलेल्या या महाविद्यालयातील ज्योती डंबाळे, द्वितीय योगिता झोंबाड तर जनता विद्यालयातील ओमकार पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांचा गुणवंत प्राचार्य म्हणून सत्कार करण्यात आला तसेच मुख्याध्यापक तुषार धोंडगे व प्रा. विनायक पवार यांचाही सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस निलिमाताई पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक सचिन पिंगळे यांनी कौतुक केले.

Web Title: Trishankeshwar College's achievement in nature-friendly state competition