त्रिपुरारी पौर्णिमेला रथोत्सव परंपरेप्रमाणे होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:15 IST2020-11-06T23:55:10+5:302020-11-09T01:15:50+5:30

त्र्यंबकेश्वर : दीपावलीनंतर रविवारी (दि.२९) त्रिपुरारी पौर्णिमा तर रथोत्सवाची सुरुवात शनिवार (दि.२८) वैकुंठ चतुर्दशीपासूनच होत असते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देवदिवाळी म्हणून त्र्यंबकेश्वरचे भूषण असलेला रथोत्सवाला वैकुंठ चतुर्थीपासूनच सुरुवात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीलादेखील मंदिर उघडण्याची शक्यता नाही. तथापि गावाचे भूषण असलेला रथोत्सव परंपरेप्रमाणे साजरा होण्याचे संकेत दिसत आहेत.

Tripurari Pournima Rathotsav will be as per tradition! | त्रिपुरारी पौर्णिमेला रथोत्सव परंपरेप्रमाणे होणार !

त्रिपुरारी पौर्णिमेला रथोत्सव परंपरेप्रमाणे होणार !

ठळक मुद्दे ग्रामदेवता महादेवीला रेडा जुंपलेल्या गाडीतून नैवेद्य पोहचवला जातो.

त्र्यंबकेश्वर : दीपावलीनंतर रविवारी (दि.२९) त्रिपुरारी पौर्णिमा तर रथोत्सवाची सुरुवात शनिवार (दि.२८) वैकुंठ चतुर्दशीपासूनच होत असते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देवदिवाळी म्हणून त्र्यंबकेश्वरचे भूषण असलेला रथोत्सवाला वैकुंठ चतुर्थीपासूनच सुरुवात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीलादेखीलमंदिर उघडण्याची शक्यता नाही. तथापि गावाचे भूषण असलेला रथोत्सव परंपरेप्रमाणे साजरा होण्याचे संकेत दिसत आहेत.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या नियमाप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यासाठी १०० फूट लांबीच्या विद्युतमाळा आदी विद्युत साहित्य पुरविण्याबाबतच्या निविदा काढल्या असून, यावर्षी रथोत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जाईल.

परंपरेप्रमाणे त्रिपूरवाती मंदिर प्रांगणात जाळल्या जात. मात्र मंदिर बंद असल्याने गावातील शिवमंदिर, जुने महादेव मंदिर आदी ठिकाणी वाती जाळतील.
दिवाळीलादेखील मंदिर उघडले जाण्याची शक्यता नाही. पण देवदिवाळीला मंदिर उघडेल अशी शक्यता वाटते. आणि एवढे वर्ष (डिसेंबर अखेरपर्यंत) नाहीच उघडले तर मात्र नवीन वर्षातच मंदिर उघडेल. त्रिपुरारी पौर्णिमेस दुपारी ११ ते १२ वाजेदरम्यान ग्रामदेवता महादेवीला रेडा जुंपलेल्या गाडीतून नैवेद्य पोहचवला जातो.

Web Title: Tripurari Pournima Rathotsav will be as per tradition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.