शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन पासच्या घोटाळ्याचा संशय, लेजरबुकसह सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:02 IST

देवस्थानकडून तीन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि लेजरसह अन्य दस्तावेज मागवल्याने संबंधित अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : त्र्यंबकेश्वरमंदिरात एका भाविकाला अडवून मारहाण करण्याचा प्रकार विश्वस्त मंडळाला भोवण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांनी भाविकाला दर्शनापासून अडवणे म्हणजे कोणत्याही देवस्थानमध्ये जाण्यापासून अटकाव करण्याचा प्रकार आहे. तो भारतीय संविधानाच्या कलम १५ चे उल्लंघन असल्याच्या दिशेने चौकशी सुरू केली आहे. 

विशेष म्हणजे भाविक ज्या अन्य भाविकांच्या मागे जात होता, त्यातील सर्वानी व्हीआयपी दर्शन पास घेतला होता का आणि एकच पास काढून किंवा न काढताही देवस्थानशी संबंधित किंवा अन्य घटकांनी परस्पर किती प्रवेश दिले याची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी देवस्थानकडून तीन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि लेजरसह अन्य दस्तावेज मागवल्याने संबंधित अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. ज्यांना दर्शन घेऊन परतण्याची घाई आहे त्यांच्यासाठी व्हीआयपी म्हणजेच सशुल्क दर्शन व्यवस्था आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च रोजी एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली असली शासनाने उपविभागीय दंडाधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. त्यांनी या घटनेची चौकशी करताना दोन प्रमुख मुद्दे चौकशीच्या अग्रस्थानी घेतले आहेत, असे समजते. हा भाविक दर्शनासाठी जात असताना काही भाविक वेगळ्या रांगेने पुढे गेले, त्यामुळे हीच रांग असावी म्हणून तो तेथे गेला, परंतु सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. 

समजा वेगळे जाणारे भाविक हे सशुल्क दर्शनाचा पास घेऊन जात असतील तर त्यांच्यासाठी वेगळी रांग आणि अन्य भाविकांना जाण्यासाठी वेगळी रांग असा कोणत्याही भाषेतील फलक तेथे नव्हता. ज्याला मारहाण झाली तो भाविक हरियाणी होता, त्यामुळे त्याला कळेल असा फलकच नव्हता.

साहजिकच कोणत्याही कारणाशिवाय अशाप्रकारे भाविकांना धर्मस्थळातून रोखणे हा भारतीय संविधानांतील कलम १४ चा भंग आहे का, या दृष्टीने ते तपास करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

चौकशीत अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर देवस्थानने सशुल्क दर्शन सेवा ठेवली असली तरी देवस्थानच्या कॅमेऱ्यात त्याच दिवशी अनेक जण रांगेत जात होते. म्हणजे सर्वांनी दर्शन पास घेतले होते काय याची तपासणी केली जात असल्याचे समजते.

मंदिराच्या विश्वस्तांपासून महसूल, पोलिस अधिकारी, पुजारी वगैरे अनेक जण आपल्याबरोबर अनेकांना एकाच वेळी घेऊन जात आहेत. मग, त्याची पास काढल्याची नोंद आहे का, नसेल तर पासमधून मिळालेले उत्पन्न बुडाल्याने त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकशी अधिकाऱ्यांनी विश्वस्तांकडून तीन महिन्याचे सीसीटीव्ही कॅमेरे, लेझर बुक मागवल्याने आता चौकशीत बरेच प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trimbakeshwar VIP Darshan Pass Scam Suspected; CCTV Footage Seized

Web Summary : Investigation launched into alleged VIP pass irregularities at Trimbakeshwar temple after devotee assault. Authorities examine CCTV footage and records to uncover potential corruption and constitutional violations regarding access to the temple.
टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिकTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळे