त्र्यंबकेश्वरला आज उटीची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 23:54 IST2022-04-25T23:51:29+5:302022-04-25T23:54:47+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे मंगळवारी (दि.२२) उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ प्रशासकीय समितीने उटी चढविण्याची तयारी पूर्ण केली असून सात दिवसांपासून वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष सुमारे ४० ते ५० किलो चंदन उगाळत आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता देवाला सुवासिक थंडगार व शीतल चंदनाचा लेप चढविल्यानंतर जीवनसमाधी थंडगार होईल.

एक वाजता उटी चढविण्यास प्रारंभ होऊन तीन वाजता उटीचे लेपन पूर्ण होईल. त्यानंतर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये भजन कीर्तन होईल. तर रात्री ११वा. उटी उतरवली जाईल. त्या उटीचा प्रसाद घेऊन भाविक वारकरी रात्रभर ठिकठिकाणी असलेल्या भजन कीर्तनात सहभागी होऊन रात्र काढतील. सकाळी त्र्यंबक ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करतील.
दरम्यान, उटीच्या वाढीसाठी येणारे वारकरी भाविक त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांचे अभंग गात, हरीनामाचा गजर करीत मंदिरात दाखल होतील. दरम्यान उटी वारीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने सफाई व आरोग्य विभाग सज्ज असून या अभियानात ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबविले जाईल, अशी माहिती माझी वसुंधरा अभियानाच्या प्रमुख पायल महाले यांनी सांगितले.
स्वच्छतेकडे अधिक लक्ष
यात्रा कालावधीत पर्यावरणाचा समतोल राखणे, लागवड केलेल्या वृक्षांना पाणी घालणे, साफसफाई करणे जंतुनाशक पावडर फवारणी वगैरे सोपस्कार नगरपरिषद राबवत आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक हिरामण ठाकरे यांनी दिली. तर दोन वर्षांनी प्रथमच भरणाऱ्या उटी वारीला
मिनी निवृत्तीनाथ यात्रा असे म्हणतात. त्यामुळे या संपूर्ण यात्रेवर नगरपरिषदेचे पूर्ण लक्ष असेल, असे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, यात्रा जत्रा समितीचे सभापती सागर उजे व मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.