तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST2017-08-05T23:58:07+5:302017-08-06T00:09:53+5:30
श्रावणातील महत्त्वाचा समजल्या जाणाºया तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबक पालिकेसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, साफसफाई, जंतुनाशके, पाणी, पथदीप आदिंची पालिकेने चोख व्यवस्था केली आहे.

तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील महत्त्वाचा समजल्या जाणाºया तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबक पालिकेसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, साफसफाई, जंतुनाशके, पाणी, पथदीप आदिंची पालिकेने चोख व्यवस्था केली आहे.
तिसºया श्रावण सोमवारी असंख्य भाविक प्रदक्षिणेसाठी येतात. भाविकांनी एसटी बसचा पत्रा वाजविणे, उगीचच चित्रविचित्र आवाज काढणे, शेती तुडविणे, प्लॅस्टिकचा कचरा करून प्रदूषण वाढवू नये. प्रदक्षिणा करताना कोणतेही व्यसन न करता मौन बाळगत आपापसात गप्पा न करता निर्मल अंत:करणाने प्रदक्षिणा करावी. प्रदक्षिणा म्हणजे फेरी नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, यात तीन पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ५५, पोलीस कर्मचारी ५३७, महिला पोलीस कर्मचारी ७३, पुरुष होमगार्ड ३५०, महिला होमगार्ड १५०, वाहतूक पोलीस ४० यांचा समावेश राहणार आहे. गावात सहा गर्दीच्या ठिकाणी आरोग्यसेवेचे तात्पुरते बूथ, फिरते आरोग्य पथक या शिवाय श्वानदंश, सर्प दंशावरील औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.