त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 12:59 IST2017-12-14T12:59:28+5:302017-12-14T12:59:44+5:30
नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर आज सकाळी मारहाण झाल्याची घटना कुशावर्त चौक येथे घडली.

त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मारहाण
त्र्यंबकेश्वर - नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर आज सकाळी मारहाण झाल्याची घटना कुशावर्त चौक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप अडसरे यास ताब्यात घेतलं आहे.
त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे आपल्या निवासस्थाना पासून जवळच असलेल्या कुशावर्त चौक येथे उभे असतांना त्यांच्या प्रदीप अडसरे या युवकाने हल्ला करून त्यांना मारण्यास सुरुवात केली.
त्यात त्यांच्या गळ्याला खर्चडले आहे. हे वृत्त समजताच शहरातील सर्व भाजप कार्यकर्ते यांना जमाव पोलीस ठाण्यात जमला असून मारहाण करणाऱ्या प्रदीप अडसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकामध्ये सुरु आहे.