त्र्यंबकला अर्ध दफन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:08 IST2020-06-09T22:20:00+5:302020-06-10T00:08:44+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अभिनव अर्ध दफन आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.

त्र्यंबकला अर्ध दफन आंदोलन
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अभिनव अर्ध दफन आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता सफाई कामगारांच्या भेटीला तहसीलदार दीपक गिरासे, मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे आंदोलन स्थळी दाखल झाले. तहसीलदार गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे आदींनी सामंजस्याची भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढली. मुख्याधिकाऱ्यांना विनंती करून येत्या १० जूनला तिन्ही ठेकेदारांना समक्ष बोलावून कामगारांसह बैठक घेऊन ठेकेदारांकडून जे काही देणे असेल ते कामगारांना देऊन टाकावे, तर कामगारांनी टोकाची भूमिका न घेता कामावर हजर व्हावे, असा सल्ला दिला.
यावेळी प्रहार संघटनेचे अनिल भडांगे, दत्तू बोडके, मोतीलाल चव्हाण, वैभव देशमुख, नितीन गवळी, अमजद पठाण, प्रमोद केदारे, प्रकाश कुमावत, अनंत दोंदे, विजय गोयर, योगेश आहेर आदी उपस्थित होते.
त्रिंबक नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करूनही वेळोवेळी पदरी निराश पडली. लोकशाही पध्दतीने न्याय मागत असताना नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोना महामारीत लोक घरात सुरक्षित असतांना आम्ही आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून
काम केले व आता नगर परिषद प्रशासन व नगरसेवक म्हणतात तीन ते चार हजार रूपयात महिनाभर काम करा नाही तर घरी बसा, असे कर्मचाºयांनी दिलेल्या निवेदनात