त्र्यंबक राजाचे वॉललाईव्ह एलईडी दर्शन सुविधा उपलब्ध करु न द्यावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:06 IST2020-07-29T19:05:42+5:302020-07-29T19:06:04+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर रथाच्या निवारा गृहाजवळ सध्या असलेल्या एल ई डी वॉल लाईव्ह दर्शन सेवा भाविकांसाठी खुली करावी अशी मागणी येथील ग्राहक मंचच्या वतीने उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

त्र्यंबक राजाचे वॉललाईव्ह एलईडी दर्शन सुविधा उपलब्ध करु न द्यावी !
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर रथाच्या निवारा गृहाजवळ सध्या असलेल्या एल ई डी वॉल लाईव्ह दर्शन सेवा भाविकांसाठी खुली करावी अशी मागणी येथील ग्राहक मंचच्या वतीने उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दीपक गिरासे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणी बरोबरच त्र्यंबक नगरपरिषदेने चार महिन्याचे गाळा भाडे घरपट्टी पाणीपट्टी किंवा एकत्रित कर आकारणीत सुट मिळावी आशा आशयाचे दुसरे निवेदन त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर मुख्याधिकारी संजय जाधव यांना दिले आहे.
तहसिलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भगवान त्र्यंबक राजाचे मंदीर उघडे असेल तर व्यावसायिकांना आर्थिक लाभ होत असतो. मात्र मंदिर केव्हा उघडायचे हा प्रश्न शासनाचा असला तरी मंदिराबाहेर वॉल लॉईव्ह एलईडी दर्शन सेवा सुरु करावी, कारण गेल्या चार महिन्यां पासून त्र्यंबकेश्वर मंदीरासह गावातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. बाजारपेठच बंद पडली आहे. सर्वांचेच व्यवसाय बंद पडल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने. अशा परिस्थितीत टेलिफोन बील, विजबील, घरभाडे, दुकानभाडे, घरपट्टी, पाणी पट्टी आदी भरणे नागरीकांना अवघड झाले आहे. म्हणुन पालिकेने मानवतेच्या दृष्टीकोनातुन सर्वच करात सवलत द्यावी. व उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी बोलुन वॉल लाइव्ह एलईडी दर्शन सुविधा उपलब्ध करु न द्यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर ग्राहक मंचचे अध्यक्ष अमर सोनवणे, नरेंद्र पेंडोळे, सुनीता भुतडा, स्विप्नल पाटील, राजेंद्र पाठक, केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, पंकज धारणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.