त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पंचायत समितीचे उपसभापती रविंद्र भोये यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव सोमवारी झालेल्या सभेत ४ विरु ध्द शून्य मतांनी मंजुर करण्यात आला. रवींद्र भोये हे अन्य सभासदांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.यावेळी सभापती सौ.ज्योती राऊत, सदस्य मोतीराम दिवे, देवराम मौळे आणि अलका झोले या चार सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करु न अविश्वास ठराव मंजूर केला. तर उर्वरीत दोन सदस्य उपसभापती रविंद्र भोये व मनाबाई भस्मे हे गैरहजर राहिले. सभेचे अध्यक्ष तथा पिठासिन अधिकारी तहसिलदार महेंद्र पवार यांनी अविश्वास मंजुर झाल्याचे घोषित केले. दि. ५ डिसेंबर रोजी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून सोमवारी (दि.१७) रोजी अविश्वास ठरावासंदर्भात बैठक बोलाविण्यात आली होती. सभासदांपासून माहिती दडविणे, महत्वाचा पत्रव्यवहार दडवणे, विकास कामांची माहिती न देणे, शासनाकडून आलेल्या निधीचा वापर वैयिक्तक स्वार्थासाठी व आपल्या विश्वासातील लोकांच्या लाभासाठी करणे, विकास कामांना अडथळे निर्माण करणे व कारभारात सभापती पेक्षा जास्त हस्तक्षेप करु न स्वत: च्या फायद्यासाठी मनमानी करणे आदी आरोप भोये यांच्यावर ठेवण्यात आले होते.
त्र्यंबक पंचायत समिती उपसभापतींवरील अविश्वास मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:43 IST
भोयेंसह दोघे अनुपस्थित : प्रस्तावात विविध आरो
त्र्यंबक पंचायत समिती उपसभापतींवरील अविश्वास मंजूर
ठळक मुद्दे रवींद्र भोये हे अन्य सभासदांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.