शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
2
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
3
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
4
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
5
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
6
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
7
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
8
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
9
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
10
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
11
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
12
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
13
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
14
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
15
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
16
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
17
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
18
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
19
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
20
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

स्वच्छ सर्वेक्षणासाठी त्र्यंबकच्या नगरसेवकांचे पाऊल पडते पुढे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:55 PM

त्र्यंबकेश्वर : येथील नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी कंबर कसली असून काहीतरी वेगळे काम करु न दाखवावे असा विचार डोळयासमोर ठेऊन आज प्रत्येक नगरसेवकाने शहर स्वच्छतेसाठी ठोस पाऊल उचलले असून बक्षिस जिंकण्याचा चंग बांधला आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी कंबर कसली असून काहीतरी वेगळे काम करु न दाखवावे असा विचार डोळयासमोर ठेऊन आज प्रत्येक नगरसेवकाने शहर स्वच्छतेसाठी ठोस पाऊल उचलले असून बक्षिस जिंकण्याचा चंग बांधला आहे. पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रत्येक नगरसेवकचाच विशेष सहभाग दिसून येत आहे. या सर्वेक्षण अंतर्गत काम करणारे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांचा विशेष सहभाग दिसुन येत आहे तर नगरसेवकांमध्ये मंगला भुजंग , शितल उगले, त्रिवेणी तुंगार, कैलास चोथे , सायली शिखरे आदींचा सहभाग प्रकर्षाने दिसुन येत आहे. पालिका निवडणुकीस उणापुरा महिना झाला नाही तर नवनिर्वाचित नगरसेवक कामाला लागले आहेत. लोकांना या स्पर्धेचे महत्व पटले. नगरसेविका मंगला आराधी व त्यांचे पती उल्हास आराधी यांनी कुशावर्त तिर्थ, कंचन तिर्थ केतकी तिर्थ आदी तिर्थ उपसुन स्वच्छ केली आहेत. तर याच प्रभागातील दुसºया नगरसेविका शितल उगले यांचे पती कुणाल उगले यांनी तर प्रभागातील प्रत्येक घरी दोन दोन डस्टबीन, बाजाराच्या कापडी पिशव्यांचे वाटप केले. ओला कचरा व सुका कचरा ठेवण्यासाठी या डस्टबीन उपयोग करायचा आहे तर प्रभागात चौका चौकात व महत्वाच्या जागी ततअशा मोठ्या कचरा पेट्या लावल्या आहेत. याशिवाय सफाई मोहीम देखील पार पाडली आहे. उपरोक्त नगरसेवकांनी सफाईवर विशेष लक्ष देऊन आपापल्या सफाई मोहिमा पुर्ण केल्या.कैलास चोथे यांनी तर एका छोटेखानी पुलाचे काम करु न प्रभागातील लोकांची गैरसोय दुर केली. याशिवाय साफसफाई तर चालुच आहे. उपनगराध्यक्ष शेलार यांनी व स्वत: नगराध्यक्ष लोहगावकर यांनी तर नुकताच मोकळा करण्यात आलेला पालिकेचा कचरा डेपोत गार्डन तयार करण्याच्या उद्देशाने सुमारे १०० ते १५० पामट्रीचे रोपटे आणून जगविले आहेत. गेली १०० ते १२५ वर्षांपासून या डेपोत कचरा डेपो कार्यरत होता. आता मात्र या ठिकाणी छानसे उद्यान आकार घेत आहे.त्र्यंबकेश्वरचा कायापालट करण्याची ही किमया नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे यांनी करु न दाखविली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. ओला कचरा व सुका कचरा संकलन करु न पालिकेच्या घंटागाडीत टाकण्यासाठी पालिका कर्मचारी यांच्याकडे देतात.--------------------शासनाच्या नगरविकास विभागाने स्वच्छता अ‍ॅपद्वारे आॅनलाईन द्वारे लोकांच्यातक्र री घेऊन तक्र ारींचे निराकरण पालिके मार्फत करण्यात येते. याबाबतचे प्रबोधन अगोदर मुख्याधिकारी यांनी केल्यानंतर आता गावाला शिस्त लागली आहे. त्यामुळे प्लॅस्टीक बंदी कापडी पिशव्यांचा वापर घराच्या परिसरात संपुर्ण स्वच्छता झाडे लावणे झाडे जगविणे ओला आण िसुका कचरा विलग करु न घंटागाडी पालिकेच्या घंटागाडीत देणे आदींची शिस्त गावाला लागल्यामुळे सर्वच नगरसेवक विविध उपक्र म राबवून स्वच्छ सर्वेक्षणच्या स्पर्धेत उतरले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक