त्र्यंबकला स्वच्छता चित्र रथाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:31 IST2018-09-26T14:31:33+5:302018-09-26T14:31:48+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यात चित्ररथाद्वारे प्रत्येक गावात ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्व व जनजागृती करणे प्रचार प्रसार करण्यासाठी चित्र रथ घेऊन जाणे हे या अभियानाचे वैशिष्ट्ये आहे.

त्र्यंबकला स्वच्छता चित्र रथाचे उदघाटन
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यात चित्ररथाद्वारे प्रत्येक गावात ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्व व जनजागृती करणे प्रचार प्रसार करण्यासाठी चित्र रथ घेऊन जाणे हे या अभियानाचे वैशिष्ट्ये आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व गावामध्ये स्वच्छतेबाबत, व्यापक मोहिमेत जनजागृती व स्वच्छतेची सुरु वात करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्वच्छतेचा तसेच स्वच्छता ही सेवा या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चित्ररथाचा शुभारंभ पंचायत समितीच्या सभापती ज्योती राऊत, उपसभापती रविंद्र भोये, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, विस्तार अधिकारी डी.एच. राठोड, गट सशोधन केंद्राचे दीपक भोये, आनंदा पवार उपस्थित होते. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या स्वच्छता रथाद्वारे खंबाळे, वाढोली, अंजनेरी, पेगलवाडी (त्र्यंबक), तळवाडे (त्र्यंबक), पिंपळद (त्र्यंबक), ब्राम्हणवाडे , माळेगाव, रोहीले , वाघेरा , वेळुंजे , अंबोली , सापगाव, चिंचवड , जातेगाव बु. , जातेगाव खु. आदी ग्रामपंचायतींना भेट देउन ठिकठिकाणी स्वच्छतेचा जागर करु न जनजागरण करण्यात आले. या अभियाना संदर्भात ग्रामस्थांना सुचना देण्यात आल्या. तर यापुढील भागात पुढील महिन्याच्या २ आॅक्टोबरपर्यंत तालुक्यातील उर्वरित ग्रामपंचायतींना स्वच्छता रथाद्वारे भेट देउन स्वच्छतेची जनजागृती करण्यात येणार आहे.