पॉलिश करण्याचा बनाव अन् सोनसाखळीवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:14+5:302021-03-13T04:26:14+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वामी समर्थ सोसायटी कल्पतरू रो बंगलो येथे राहणाऱ्या कल्पना बाळासाहेब थोरात (६३) यांनी पोलीस ...

पॉलिश करण्याचा बनाव अन् सोनसाखळीवर डल्ला
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वामी समर्थ सोसायटी कल्पतरू रो बंगलो येथे राहणाऱ्या कल्पना बाळासाहेब थोरात (६३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास २० ते २५ वयोगटातील पांढरा व लव्हेंडर रंगाचा शर्ट परिधान केलेले दोघे संशयित थोरात यांच्या घरी आले व त्यांनी आम्ही सोन्याचांदीचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी थोरात यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची पोत पॉलिश करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून काढून घेतली व हातचलाखी करून थोरात यांची नजर चुकवून सव्वालाख रुपये किमतीची सोन्याची पोत घेऊन पल्सरसारख्या दुचाकीने धूम ठोकली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस मिळालेल्या वर्णनावरून चोरट्यांचा उशिरापर्यंत शोध घेत होते; मात्र संशयित पोलिसांना आढळून आले नाहीत.