संघकार्य वाढविणे हीच उषातार्इंना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:03 IST2017-09-02T00:02:47+5:302017-09-02T00:03:10+5:30
राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख उषाताई चाटी यांचे कार्य प्रेरणादायी असून अडचणींवर मात करून कार्य पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. परिपूर्ण संघकार्य वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार शोकसभेत व्यक्त करण्यात आले.

संघकार्य वाढविणे हीच उषातार्इंना श्रद्धांजली
नाशिक : राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख उषाताई चाटी यांचे कार्य प्रेरणादायी असून अडचणींवर मात करून कार्य पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. परिपूर्ण संघकार्य वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार शोकसभेत व्यक्त करण्यात आले.
उषाताई चाटी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा अस्थिकलश सकाळी राणी लक्ष्मीबाई भवन मेहेर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोकसभा संपन्न झाली. समितीच्या नागपूर येथील अखिल भारतीय कार्यालयप्रमुख चित्राताई जोशी यांनी प्रमुख भाषणात उषाताई यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. स्वभावाने अत्यंत शांत असलेल्या उषाताई या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या तसेच समितीच्या उत्तर प्रदेशच्या प्रमुख म्हणून काम करताना तेथील पारंपरिक बंधनांमधून महिलांना बाहेर काढून सेवेकडे वळविण्यासाठी प्रयत्न केल्या. त्यामुळेच अनेक कार्यकर्त्या घडल्या, असे त्या म्हणाल्या.
यावेळी शोभाताई गोसावी, मंगलाताई सौंदाणकर. विद्याताई चिपळूणकर यांनीदेखील भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रांत सह प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, शहर संचालक विजय कदम, संजय कुलकर्णी, गोविंदराव यार्दी, बन्सी जोशी, मदन भंदुरे, नाना नेऊरगावकर, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, सुधाकर नेवे, प्रदीप निकम, दिनकर देशमुख, महेश हिरे, दिवाकर रत्नपारखी आदींसह राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली सभेनंतर अस्थि विसर्जन रामकुंड येथे झाले. यावेळी उषाताई यांचे पुतणे उदय, डॉ.धनंजय व अभय चाटी उपस्थित होते.