विजयदिनानिमित्त शहिदांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:25 IST2020-07-27T21:32:31+5:302020-07-27T23:25:02+5:30
सिडको : एकविसाव्या कारगिल विजय दिनानिमित्ताने चुंचाळे शिवार येथील कारगिल चौकात शहिदांना आमदार सीमा हिरे यांच्यासह नागरिकांनी आदरांजली अर्पण केली.

विजयदिनानिमित्त शहिदांना आदरांजली
ठळक मुद्देकारगिल युद्धाच्या वेळेस ८५० सैनिक शहीद
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : एकविसाव्या कारगिल विजय दिनानिमित्ताने चुंचाळे शिवार येथील कारगिल चौकात शहिदांना आमदार सीमा हिरे यांच्यासह नागरिकांनी आदरांजली अर्पण केली.
यावेळी भारत मातेचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, कारगिल युद्धाच्या वेळेस ८५० सैनिक शहीद झाले असून, १४०० सैनिक जखमी झाले होते. यावेळी नगरसेवक राकेश दोंदे, मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. वैभव महाले, राहुल राऊत, मुन्ना दोंदे, सुशील नाईक, गणेश दातीर, परमेश्वर खांडेभराड, प्रकाश सुर्वे, दीपक हनवते, राजू खाटिक, श्याम घुले आदी उपस्थित होते.