सटाणा : शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकात चीन-भारत सीमेवर युध्दात भारतीय जवान शहीद झाले. शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.भारत-चीन सीमा रेषेवर सीमारेषेचे उल्लंघन करून कराराप्रमाणे अंमलबजावणी न करता घुसखोरी केली. भारतीय सेनेने त्यास प्रत्युत्तर देऊन चीनला चांगलाच धडा शिकविला .या युद्धात भारतीय जवान शहीद झाले. चीन नेहमी सीमारेषेचे उल्लंघन करीत असतो. नेपाळ पाकिस्तान या देशांना चीन नेहमी भारताविरु द्ध चिथावणी देत असतो. सीमारेषेवर घुसखोरी करून युद्धसदृश परिस्थिती निर्माण करणे चीनचे नेहमी वाईट कृत्य राहिले आहे. यावेळी मात्र भारतीय सैन्य दलाने त्यांना चोख उत्तर दिले. परंतु या युद्धामध्ये आपले भारतीय जवान शहीद झाले. तसेच मालेगाव तालुक्यातील साकोरी येथील शहीद जवान सचिन विक्र म मोरे हा जवान आपल्या दोन साथीदार जवानांना वाचिवण्यासाठी गलवान खोर्यातील दरीतील नदीत उतरल्याने त्यांना वीर मरण प्राप्त झाले. शहीद वीर जवान सचिन मोरे व इतर सर्व भारतीय वीर शहीदजवानांना यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कदम, सटाणा नगर परिषदेचे सभापती नगरसेवक राहुल पाटील, रवींद्र मराठे, दिनकर पाटील, खलील शेख, मनोज ठोले, येजाज शेख, रजिवान सय्यद, बबलू शेख, राकेश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, संजय जाधव रवींद्र पवार आदी उपस्थित होते.
सटाण्यात शहीद जवानांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:51 IST
सटाणा : शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकात चीन-भारत सीमेवर युध्दात भारतीय जवान शहीद झाले. शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सटाण्यात शहीद जवानांना आदरांजली
ठळक मुद्देचीन नेहमी सीमारेषेचे उल्लंघन करीत असतो