महंत नरेंद्रगिरी महाराज यांना त्र्यंबककरांची श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:48+5:302021-09-25T04:14:48+5:30
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा प्रयागराज येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने देशभर खळबळ ...

महंत नरेंद्रगिरी महाराज यांना त्र्यंबककरांची श्रध्दांजली
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा प्रयागराज येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने देशभर खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, नियोजन, बैठका, विविध समारंभ यानिमित्ताने बहुसंख्य ग्रामस्थांचा त्यांच्याशी जवळचा संबंध आला होता. त्यांच्या अचानक जाण्याने येथील साधुसंतांबरोबरच त्र्यंबकवासीयदेखील हळहळले. त्र्यंबकनगरीच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे ब्रह्मलीन नरेंद्रगिरी महाराज यांच्या प्रती असलेल्या आदर भावना व्यक्त करण्यासाठी नगर परिषद सभागृहात नगराच्या वतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
स्व. नरेंद्रगिरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन सभेला सुरुवात करण्यात आली. नरेंद्रगिरी महाराजांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या संशयास्पद मृत्युचा योग्य तपास होऊन दोषींना कडक शासन करण्याची मागणी अनेकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
महंत सागरानंद सरस्वती महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक स्वप्नील शेलार, कैलास चोथे, सागर उजे, शाम गंगापुत्र, पुरोहित संघ अध्यक्ष प्रशांत गायधनी, सुरेश गंगापुत्र, गोविंद मुळे, प्रभाकर जोशी, लक्ष्मीकांत थेटे, कमलेश जोशी, सुयोग वाडेकर, शांताराम बागुल, किरण चौधरी, रामचंद्र गुंड, उपेंद्र शिखरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध आखाड्याचे साधुमहंत व ग्रामस्थ उपस्थित होते. (२४ टीबीके ३, ४)
240921\24nsk_35_24092021_13.jpg
महंत नरेंद्रगिरी महाराज यांना त्र्यंबकरांची श्रध्दांजली