शहिद झालेल्या जवानांना कॉग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:54 IST2020-06-27T16:48:14+5:302020-06-27T16:54:50+5:30

निफाड : निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्र मात गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Tribute on behalf of the Congress to the martyred soldiers | शहिद झालेल्या जवानांना कॉग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

निफाड येथील काँग्रेस भवन येथे गलवान खोºयात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करतांना मधुकर शेलार, भय्या देशमुख, सचिन होळकर, सुनील निकाळे, सचिन खडताळे, सुहास सुरळीकर, राजेश लोखंडे, अनिल शिंदे, बापूसाहेब शिंदे, भय्या मणियार, राहुल नागरे, पुंजा तासकर, वसंत कापसे, मधुसूदन आव्हाड आदी.

ठळक मुद्देमेणबत्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण

निफाड : निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्र मात गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी भैया देशमुख, निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, तालुका काँग्रेस अनुसूचित सेलचे अध्यक्ष राजेश लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सचिन होळकर, सुनील निकाळे, तालुका युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, तालुका युवक कॉग्रेसचे सरचिटणीस सुहास सुरळीकर, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक शिंदे, सुनील शिंदे, राजेंद्र बागडे, नंदिकशोर कापसे, अनिल शिंदे, बापूसाहेब शिंदे, भैया मणियार, राहुल नागरे, पुंजा तासकर, वसंत कापसे, मधुसूदन आव्हाड, आदी उपस्थित होते.

Web Title: Tribute on behalf of the Congress to the martyred soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.