वृक्ष लागवड करून बहुगुणांना श्रद्धांजली अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:14 IST2021-05-24T04:14:15+5:302021-05-24T04:14:15+5:30
मातोरी : वृक्षप्रेमींकडून चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांना वृक्ष लागवड करत श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

वृक्ष लागवड करून बहुगुणांना श्रद्धांजली अर्पण
मातोरी : वृक्षप्रेमींकडून चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांना वृक्ष लागवड करत श्रद्धांजली वाहण्यात आली. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागातील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली. त्यामुळे वृक्ष संवर्धनाची जी चळवळ निर्माण झाली. ही चळवळ यापुढेही जोपासली जावी यासाठी तरुण पिढीने पुढे यावे व प्रत्येकाने एक वृक्ष लावावा, अशी अपेक्षा मखमलाबाद येथील वृक्ष मित्र तुषार पिंगळे यांनी केली आहे. यावेळी चामारलेणीच्या पायथ्याला वटवृक्ष लागवड करत सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच एक हजार वृक्ष लागवड करण्याची तयारी करण्यास शुभारंभ करण्यात आला. यावेळी सागर शेलार, किरण काकड, प्रसाद भामरे, आशिष प्रजापती, वृषाली जैन, डॉ,बिनायकर, अजय अवस्थी व वृक्षवल्ली फाऊंडेशन सदस्य उपस्थित होते. (फोटो २२ झाड)