दिंडोरीत श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासींचे हक्काग्रह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:53 IST2020-05-27T21:53:52+5:302020-05-27T23:53:41+5:30
दिंडोरी : कोरोना विषाणूच्या संकटातही गरीब कष्टकरी बांधवांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळण्याचा त्यांचा हक्क मिळावा म्हणून श्रमजीवी संघटनेने आपल्या हक्कांसाठी हक्काग्रह आंदोलन जिल्हा सरचिटणीस भागवत मधे, संतोष ठोंबरे, तालुकाध्यक्ष मुरलीधर कनोजे, यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

दिंडोरीत श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासींचे हक्काग्रह आंदोलन
दिंडोरी : कोरोना विषाणूच्या संकटातही गरीब कष्टकरी बांधवांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळण्याचा त्यांचा हक्क मिळावा म्हणून श्रमजीवी संघटनेने आपल्या हक्कांसाठी हक्काग्रह आंदोलन जिल्हा सरचिटणीस भागवत मधे, संतोष ठोंबरे, तालुकाध्यक्ष मुरलीधर कनोजे, यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाचा व्यवहार बंद पडला आहे, याकाळात झालेल्या लॉकडाउनमुळे गरीब आदिवासी मजूर बांधवांवर उपासमार ओढावली. या संकटकाळात गरिबांना आधार देण्याची नैतिक आणि संविधानिक जबादारी ही शासनाची आहे, असे मधे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात कांतीलाल खोटरे, योगेश चौधरी, जनार्दन झिरवाळ आदींसह ५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.