आदिवासी खेळाडूंना आपुलकीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 17:15 IST2019-01-01T17:11:22+5:302019-01-01T17:15:46+5:30

धावपटूंना मदत : उबदार स्वेटरचे वाटप

 Tribal players gift of affection | आदिवासी खेळाडूंना आपुलकीची भेट

आदिवासी खेळाडूंना आपुलकीची भेट

ठळक मुद्देआदिवासी खेळाडूंना डॉ. अजित व गिता कुमठेकर यांनी १५ हजार रु पयांची मदत केली

पेठ -आपुलकी बहुद्देशीय सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून नाचलोंढी येथील आदिवासी खेळाडूंना डॉ. अजित व गिता कुमठेकर यांनी १५ हजार रु पयांची मदत केली तर राकेश दळवी, प्रदिप वीरनारायण यांनीही आर्थिक मदतीचा हात दिला.
कै. केशवराव थोरात यांच्या स्मृतीदिनानिमित्त थोरात कुटुंबीयांच्यावतीने ३२ स्वेटर व सर्व खेळाडूंना सुग्रास भोजनाची मेजवानी देण्यात आली. यावेळी माधविगरी महाराज, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर, सुर्यकांत लवटे, नगरसेवक सुनिता कोठूळे, अंजली कानेटकर, विक्र ांत थोरात, शिवाजी गायकवाड, केशव पोरजे, आपुलकीचे अध्यक्ष खंडेराव डावरे, सचिव शांताराम गायकवाड, सहसचिव रामदास शिंदे, उपाध्यक्ष जयवंत राऊत,खजिनदार कविता डावरे, मार्गदर्शक विष्णू हगवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


 

Web Title:  Tribal players gift of affection

टॅग्स :Nashikनाशिक