आदिवासी शेतकरी कुटुंबावर हल्ला
By Admin | Updated: August 2, 2016 00:55 IST2016-08-02T00:54:22+5:302016-08-02T00:55:24+5:30
कावनई : जमिनीच्या वादातून दोन गटात धुमश्चक्र ी

आदिवासी शेतकरी कुटुंबावर हल्ला
घोटी: इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे शेतजमिनीच्या किरकोळ वादातून एका आदिवासी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत पीडित कुटुंबाने आज घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दिली असून, घोटी पोलिसानी चार संशयितांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला
आहे.
कावनई येथील हिराबाई वाघ यांचे कुटुंब घडलेल्या घटनेमुळे भयभीत झाले असून, याविरोधात त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे. यानुसार घोटी पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला
आहे.दरम्यान, ही जमीन हिराबाई वाघ यांनी १९९३ साली खरेदी केली असून, या भागात शेतजमिनीस सोन्याचे भाव आल्याने खरेदीनंतरही जमीन लाटण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप हिराबाई वाघ यांनी केला आहे. (वार्ताहर)