सुरगाण्यात आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:21 IST2020-08-10T22:26:57+5:302020-08-11T01:21:34+5:30
सुरगाणा : तालुक्यातील बेलबारी (माणी) सह पांगारणे, बाºहे, पळसन, बेलबारी, बोरगावसह विविध ठिकाणी आदिवासी दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

सुरगाण्यात आदिवासी दिन
सुरगाणा : तालुक्यातील बेलबारी (माणी) सह पांगारणे, बाºहे, पळसन, बेलबारी, बोरगावसह विविध ठिकाणी आदिवासी दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महादेवाचे तीर्थक्षेत्र असलेल्या बेलबारी (माणी) येथे आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार जे.पी. गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आदिवासीसाठी समाजकार्य करणारे आदिवासी कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी पारंपरिक वादनात पिढीदेव धानपूजा करण्यात येऊन आदिवासी समाजाने एकजुटीने रहाण्याचे आवाहन करण्यात आले.