शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला- बीएड़च्या जागा रिक्त राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 18:47 IST

बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आणि एमएड यांसारख्या शिक्षणशास्त्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती पूर्णत: बदलली असून सध्या बीएड, एमड झालेले पदवीधरही बेरोजगार असल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल ओसरला आहे. त्यामुळे राज्यात बीएडच्या उपलब्ध जागांवर प्रवेशासाठीही विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबीएड एमएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला राज्यातील बीएडच्या सात हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता ४४ हजार जागा उपलब्ध , केवळ ३७ हजार विद्यार्थ्यांनी केले सीईटीसाठी अर्ज

नाशिक : बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आणि एमएड यांसारख्या शिक्षणशास्त्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती पूर्णत: बदलली असून सध्या बीएड, एमड झालेले पदवीधरही बेरोजगार असल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल ओसरला आहे. त्यामुळे राज्यात बीएडच्या उपलब्ध जागांवर प्रवेशासाठीही विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्यात यावर्षी बीएडच्या जवळपास ४४ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा दिसून येत नाही. उपलब्ध ४४ हजार जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून केवळ ३७ हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे परीक्षा देणाºया प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित मानला जात असला तरी राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये जवळपास सात हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये बीएडच्या जवळपास १७५० जागा उपलब्ध आहेत, तर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षात हा आकडा कमी असण्याची शक्यता असल्याने सीईटीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात एमएडच्याही उपलब्ध २ हजार ६५९ जागांपैकी काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये एमएडच्या जवळपास १०० जागा उपलब्ध असून, जिल्ह्यातून केवळ ४९ विद्यार्थ्यांनीच सीईटीसाठी अर्ज केले आहेत. उर्वरित जागांवर बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येण्याची शक्यता खूपच कमी असल्याने यापैकी ३० ते ४० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. ८ व ९ जूनला सीईटी बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह ३७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण एक हजार अर्जांपेक्षाही कमी आहे. दरम्यान, प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्या माध्यमातून महाविद्यालयांचीही विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विविध संस्थांच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय