शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंपदा खाक : दगडखाणीमधील भु-सुरुंग स्फोटाने भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:11 IST

डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वनवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देवनक्षेत्राला लागून दगडखाणीत भुसुरूंगाचे स्फोटजैवविविधतेची अपरिमित हानीमहसुल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौ-यावर

नाशिक : पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगराच्या माथ्यावर कृत्रिम वनवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वनवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून दगडखाणीत भुसुरूंगाचे स्फोट घडविले जात असल्यामुळे त्याच्या ठिणग्या उडून वनवे भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहे; मात्र वनविभागाला अद्यापही याप्रकरणी एकही संशयित आढळून आला नसून केवळ ‘तपास’ सुरू आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते हे विशेष!बेळगाव ढगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढकाराने वृक्षराजी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. तीन वर्षांपुर्वी ४० एकर क्षेत्रात संतोषा, भागडी डोंगराच्या पायथ्याशी २७ हजाराहूंन अधिक रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. डोंगराच्या एका बाजूला वृक्षराजी वाढवून वनक्षेत्राचे संवर्धन होत असले तरी दुसºया बाजूने सारूळ शिवारात हेच डोंगर दगडखाणीत उत्खनन करून पोखरले जात आहे. विशेष म्हणजे महसूल-वने विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव ढग गावातील लोक डोंगराला हिरवाईचा साज चढविण्यासाठी कष्ट उपसत असताना दुसरीकडे या डोंगराची बाजू मात्र पोखरली जात आहे. त्यामुळे वनविभागाने येथील डोंगराचे व त्याभोवती असलेल्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलून तातडीने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरूवारी (दि.३०) महसुल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौ-यावर असून३३ कोटी वृक्षलागवडीबाबात ते प्रशासकीय बैठक घेणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या तोंडावर कृत्रिम वनवा लागून दहा ते बारा वर्षांपुर्वीची शेकडो वृक्ष होरपळून गेली. तसेच पशुपक्ष्यांचे अंडी या भागात असल्यामुळे त्यांनीही आपली जागा सोडली नाही, परिणामी त्यांनाही जीव गमवावा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.जैवविविधतेची अपरिमित हानीपाच ते दहा वर्षांपुर्वी नैसर्गिकरित्या डोंगरमाथ्यावर वाढलेली तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारख्या भारतीय प्रजातीची शेकडो झाडे दोन दिवसीय कृत्रीम वनव्यात खाक झाली. जैवविविधतेची होणारी अपरिमित हानी भरून न येणारी असून वनविभाग व जिल्हा प्रशासन, महसूल विभागाने संयुक्तरित्या कठोर कारवाई करण्याची मागणी आपलं पर्यावरण संस्था, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयforest departmentवनविभागfireआगforestजंगलenvironmentवातावरण