शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम वणव्यात वृक्षसंपदा होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:37 IST

पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली

नाशिक : पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वणवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून दगडखाणीत भूसुरुंगाचे स्फोट घडविले जात असल्यामुळे त्याच्या ठिणग्या उडून वणवा भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहे. वनविभागाला अद्याप या प्रकरणी एकही संशयित आढळून आला नसून केवळ तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते हे विशेष!बेळगाव ढगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकाराने वृक्षराजी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. तीन वर्षांपूर्वी ४० एकर क्षेत्रात संतोषा, भागडी डोंगराच्या पायथ्याशी २७ हजारांहून अधिक रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. डोंगराच्या एका बाजूला वृक्षराजी वाढवून वनक्षेत्राचे संवर्धन होत असले तरी दुसºया बाजूने सारूळ शिवारात हेच डोंगर दगडखाणीत उत्खनन करून पोखरले जात आहे. विशेष म्हणजे महसूल-वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव ढगा गावातील लोक डोंगराला हिरवाईचा साज चढविण्यासाठी कष्ट उपसत असताना दुसरीकडे या डोंगराची बाजू मात्र पोखरली जात आहे.त्यामुळे वनविभागाने येथील डोंगराचे व त्याभोवती असलेल्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलून तातडीने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरुवारी (दि.३०) महसूल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौºयावर असून ३३ कोटी वृक्षलागवडीबाबात ते प्रशासकीय बैठक घेणार आहेत.त्यांच्या दौºयाच्या तोंडावर कृत्रिम वणवा लागून दहा ते बारा वर्षांपूर्वीची शेकडो झाडे होरपळली होती. तसेच पक्ष्यांची अंडी या भागात असल्यामुळे त्यांनीही आपली जागा सोडली नाही, परिणामी त्यांनाही जीव गमवावा लागला.जैवविविधतेची अपरिमित हानीपाच ते दहा वर्षांपूर्वी नैसर्गिकरीत्या डोंगरमाथ्यावर वाढलेली तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारखी भारतीय प्रजातीची शेकडो झाडे दोन दिवसात कृत्रिम वणव्यात खाक झाली. जैवविविधतेची होणारी अपरिमित हानी भरून न येणारी असून वनविभाग, जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने संयुक्तरीत्या कठोर कारवाई करण्याची मागणी आपलं पर्यावरण संस्था, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागFairजत्रा