खामखेडा येथे वृक्ष लागवड प्रभात फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:02 IST2019-07-15T18:01:50+5:302019-07-15T18:02:19+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वृक्ष दिंडी काढण्यात येऊन वृक्ष लागवड जनजागृती दिंडी करण्यात आली. जनता विद्यालय खामखेडा ...

खामखेडा येथे टाळ मृदुगाच्या गजरात वृक्ष लागवड जनजागृती प्रभात फेरी.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वृक्ष दिंडी काढण्यात येऊन वृक्ष लागवड जनजागृती दिंडी करण्यात आली.
जनता विद्यालय खामखेडा व जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्या संयुक्तपणे गावात टाळ मृदुगाच्या गजरात वृक्ष लागवड प्रभात फेरी काढण्यात आली.
हि वृक्ष लागवड दिंडी शाळेपासून सुरु करण्यात येऊन सदर दिंडी ग्रामपंचायत कार्यालय, राम मंदिर, वाणी गल्ली, बँक, बाजार पट्टी, आदिवासी वस्ती, बस सण्ड काढण्यात आली.
यावेळी विघ्यार्थिनी विविध वेशभूषा करून, विध्यार्थ्याच्या हातात वृक्ष लागवड घोषणा फलक होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ यांनी उपस्थित नागरिकांना वृक्ष लागवड करण्याविषय मार्गदर्शन केले. यावेळी दोन्ही शाळेचे विध्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.