नाशिक सायकलिस्टकडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:00+5:302021-06-19T04:11:00+5:30
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धन उपक्रमासाठी १५०० भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यापैकी ...

नाशिक सायकलिस्टकडून वृक्षारोपण
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धन उपक्रमासाठी १५०० भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यापैकी दरी मातोरी परिसरात ४०० वृक्षाचे रोपण करण्यात आले असून, उर्वरित ११०० वृक्षारोपण रविवारी चामर लेणी परिसरात करण्यात येणार आहे. त्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशनचे संचालक किशोर माने यांनी ही सर्व वृक्षरोपे दान करून उपक्रमात पुढाकार घेतला. हा उपक्रम नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन व वृक्षवल्ली फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राबविला आहे. याप्रसंगी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, वृक्षवल्ली फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शेलार, तसेच चंद्रकांत नाईक, डॉ. मनीषा रौंदळ, रवींद्र दुसाने, संजय पवार. डॉ. नितीन रौंदळ, साधना दुसाने, डॉ. सोनाली पाटील, सतीश महाजन, सतीश चापोरकर, पुष्पा सिंग, अजय सिंग, ऐश्वर्या वाघ, अनुजा उगले, अरुण उमरजीकर, रामदास सोनवणे यांनी वृक्षारोपणात योगदान दिले.
फोटो
१८ सायकलिस्ट वृक्षारोपण