कोरोना योद्ध्यांकडून वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 17:42 IST2020-07-09T17:41:43+5:302020-07-09T17:42:01+5:30
आठवण म्हणून पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण

कोरोना योद्ध्यांकडून वृक्षलागवड
वेळुंजे : राज्यात सुरु वातीच्या काळातच कोरोना विषाणू संसर्गाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात कर्तव्य बजावून सुस्थितीत परतलेल्या हरसूल (ता.त्र्यंबकेश्वर) पोलिसांकडून कोरोना योध्दयांची अविस्मरणीय आठवण म्हणून पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
मार्च महिन्याच्या सुरु वातीच्या काळात मालेगाव शहरात कोरोना बधितांच्या आकड्याने मोठा उच्चांक गाठला होता. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणांबरोबरच पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावले. मालेगाव शहरात हरसूल येथील पोलिसांनी सेवा बजावली. मालेगावहून पुन्हा एकदा आपल्या मूळ ठिकाणी कर्तव्यावर परतलेल्या हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ही कोरोना योद्धांची अविस्मरणीय आठवण असल्याचे टकले यांनी सांगितले. यावेळी पोलीस हवालदार दिलीप बोडके,पोलीस शिपाई उमाकांत बच्छाव , विलास जाधव ,मोहित सोनवणे,संदीप दुनबळे आदी उपस्थित होते.