वणीत ६० बाधितांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:04 IST2021-04-01T22:14:51+5:302021-04-02T01:04:19+5:30
वणी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तसेच कोविड सेंटरमध्ये जागा नसल्याने बाधितांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

वणीत ६० बाधितांवर उपचार सुरू
ठळक मुद्देसद्य:स्थितीत वणी येथे बाधितांची संख्या ९३ झाली आहे.
वणी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तसेच कोविड सेंटरमध्ये जागा नसल्याने बाधितांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
सद्य:स्थितीत वणी येथे बाधितांची संख्या ९३ झाली आहे. पैकी ३० बाधित उपचारांनंतर बरे झाले आहेत. तर, ६० बाधितांवर उपचार सुरू असून तीन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, २० क्षमता असलेल्या वणीच्या कोविड सेंटरमध्ये नवीन बाधितांसाठी जागा नाही, तर बोपेगाव येथेही क्षमतेनुसार दाखल बाधितांची संख्या आरोग्य विभागाची कसोटी पाहणारी असल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बागुल यांनी व्यक्त केले.