शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळा; पती-पत्नीने चिठ्ठी लिहिली अन्...; सर्वांचेच डोळे पाणावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 21:11 IST

कुटुंबीयांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल आढळल्या. 

Sinnar Crime: सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथील दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी मुलीच्या मामा आणि मावशी यांना उद्देशून 'आमच्या पाच वर्षांच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा' अशा आशयाच्या लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकुराने सर्वांचेच डोळे पाणावले. 

ज्ञानेश्वर अशोक बोराडे (३५) व दीपाली ज्ञानेश्वर बोराडे (३०) अशी मृतांची नावे आहेत. ते शेतीसह दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना पाच वर्षांची  आराध्या नावाची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडले. रविवारी (दि.२२) सकाळी ज्ञानेश्वर यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. कुटुंबीयांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल आढळल्या. 

मामा-मावशीच्या नावाने चिठ्ठी लिहिली अन्...

वावी पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता दोन तासांनंतर विहिरीच्या तळाला दोघांचे मृतदेह मिळून आले. शनिवारी (दि.२१) आर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी मुलीच्या मामा व मावशींना उद्देशून माफ करा, आमच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा, आमच्या वाट्याची जमीन तिच्या नावावर करा असे लिहिले आहे. या मजकुराने अनेकांचे डोळे पाणावले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस