,भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवार्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:50 IST2020-02-16T15:49:39+5:302020-02-16T15:50:05+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर भागाला वरदान ठरलेल्या भोजापूर धरणातून रब्बीसाठी ८० क्यूसेकने आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, गतवर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पाण्याची फारशी चणचण निर्माण झाली नाही.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन.
भोजापूर धरणावर अवलंबून असणार्या संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण,कन्हे, पिंपळे त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातीलनांदूरशिंगोटे,दोडी खुर्द,दोडी बुद्रुक,माळवाडी,सुरेगाव, मानोरी, कणकोरी, निन्हाळे आदीगावांच्या शिवारात रब्बीचे आवर्तन देण्यात येते.भोजापूर धरणावर डावा व उजवा असे दोनकालवे असून, या दोन कालव्यांद्वारे या गावांनाशेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. तरीशेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
दीड हजार हेक्टरसाठी
पाणी मागणी
भोजापूर धरणाचे डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांवर एकूण ४५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. तथापि, डाव्या कालव्यावर 1 हजार शंभर, तर उजव्या कालव्यावर चारशे हेक्टर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे आले असल्याची माहिती शाखा अभियंता बी. डब्लू. बोडके यांनी दिली. दरवर्षी २१-२२ दिवस रोटेशन चालते. तथापि, यावर्षी दोन दिवस कमी होऊ शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तिवली आहे.