कंटेनरमधून प्रवास; २७ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 00:14 IST2020-04-02T00:12:55+5:302020-04-02T00:14:01+5:30
पुण्याहून जळगावकडे जात असलेल्या मालवाहू कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या २७ जणांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली.

नांदगाव येथे ताब्यात घेण्यात आलेल्या प्रवाशांची ग्रामीण रु ग्णालयात तपासणी करण्यात आली.
नांदगाव : पुण्याहून जळगावकडे जात असलेल्या मालवाहू कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या २७ जणांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली.
बुधवारी दुपारी ४ वाजता औरंगाबाद रस्त्यावर पोलिसांना मालवाहू कंटेनर दिसला. कंटेनर चालकाला थांबविण्यात आले. तपासणी केली असता कंटेनरमध्ये २७ जण निदर्शनास आले. त्यांना उतरविण्यात आले.
या सर्वांची ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी तपासणी केली. ते सर्व प्रवासी मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातील मजूर असून पुण्याहून ते संगमनेरपर्यंत पायी प्रवास करून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना कंटेनर चालकाने लिप्ट दिली असे त्या मजुरांनी पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, प्रवास करणारे सर्व जण कोरोना निगेटिव्ह असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला आहे़. ताब्यात घेण्यात आलेल्या या सर्वांना त्यांच्या जेवण्यासह राहण्याची व्यवस्था शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या येथील मविप्रच्या महाविद्यालयातील तापुरत्या निवाराशेडमध्ये करण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांनी दिली.