उड्डाणपुलावरून दुचाकी वाहनांची वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:46 IST2018-09-04T00:46:29+5:302018-09-04T00:46:50+5:30

महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊ यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Transport of two-wheeler vehicles from the flyover | उड्डाणपुलावरून दुचाकी वाहनांची वाहतूक सुरूच

उड्डाणपुलावरून दुचाकी वाहनांची वाहतूक सुरूच

पंचवटी : महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊ यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे उड्डाणपुलावरून होणाऱ्या या दुचाकी वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याचे  दिसून येत आहे.  क.का. वाघ महाविद्यालय ते द्वारकापर्यंत व तेथून पुढे असलेल्या उड्डाणपुलावरून दुचाकीधारक सर्रासपणे ये-जा करीत असल्याचे दैनंदिन बघायला मिळते.  उड्डाणपुलावरून दिवसभर चारचाकी, मालवाहू वाहने तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनात अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांत अपघात झाल्याची घटना घडून काही जण जखमी झालेले होते. या उड्डाणपुलावरून दुचाकीवाहन धारकांना वाहने नेण्यास मनाई असल्याचे वाहतूक पोलीस शाखेकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र दुचाकीधारक नियमांची पायमल्ली करून उघडपणे उड्डाणपुलावरून दुचाकीवाहनांची वाहतूक करीत असल्याचे दिसून येते.
रिक्षांचाही उड्डाणपुलावर वावर
उड्डाणपुलावरून चारचाकी वगळता दुचाकी तसेच रिक्षांना वाहतूक करण्यास मनाई असली तरी दुचाकी वाहनधारकांपाठोपाठ काही बेशिस्त रिक्षाचालक या उड्डाणपुलावरून प्रवासी वाहतूक करीत असतात. वाहतूक शाखेकडून अशा बेशिस्त वाहनचालकांविरु द्ध कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Transport of two-wheeler vehicles from the flyover