वाहतूक नियमांचे पालन गरजेचे
By Admin | Updated: January 17, 2016 22:51 IST2016-01-17T22:45:52+5:302016-01-17T22:51:35+5:30
भरत कळसकर : २७वे रस्ता सुरक्षा अभियान

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे
पंचवटी : अपघातात जीव गमावणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.
२७व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांत प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. या सुरक्षा सप्ताहानिमित्त पंचवटी महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाउंडेशन आदि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अपघातात तरुणांचे जीव जाण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. वाहने चालविताना मोबाइल, मद्यपान या गोष्टी टाळाव्यात आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा. अपघातात एखाद्या तरुणाचा बळी गेला तर केवळ त्याच्या कुटुंबाचीच नव्हे तर देशाची हानी होते असे
मत अधिकाऱ्यांनी व्यक्त
केले.
या रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी मुंबई येथील तत्कालिक सुरक्षा गीत व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सुदाम सूर्यवंशी, अतुल चव्हाण, प्रकाश बनकर, सचिन पाटील, संकेत गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)