इनोव्हा कारमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:39+5:302021-04-15T04:13:39+5:30

अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईकडे कारमधून जनावरांचे मांस नेले जात असल्याचा संशय होता. याआधारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस ...

Transport of animal meat from Innova car | इनोव्हा कारमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक

इनोव्हा कारमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक

अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईकडे कारमधून जनावरांचे मांस नेले जात असल्याचा संशय होता. याआधारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. कोते, हवालदार प्रकाश गवळी, दशरथ मोरे, नितीन जगताप, शिपाई आव्हाड, पोलीस शिपाई जाधव यांनी बुधवारी (दि.१४) पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास वावी पोलीस स्टेशन हद्दीत नांदूरशिंगोटे गावचे शिवारात संगमनेर- सिन्नर रोडवर अहमदनगर व नाशिक सरहद्द नाकाबंदी पॉइंटवर इनोव्हा कार(क्रमांक एम एच ०१ बी एफ १५७०) अडवली. त्यात असलेल्या शहानवास महम्मद हुसेन कुरेशी (२०) रा. संगमनेर व मिराज अहमद कुरेशी (१९) रा. दादा मियाँ उसमान चाळ, कुरेश नगर, हाजी करमत अली रोड, कुर्ला, मुंबई या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दोघा संशयित इसमांविरुध्द वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते करीत आहेत.

फोटो - १४ सिन्नर कार

संगमनेर-सिन्नर रस्त्यावर नांदूरशिंगोटे शिवारात जनावरांचे मांस घेऊन जाणारी हीच ती इनोव्हा कार.

===Photopath===

140421\14nsk_38_14042021_13.jpg

===Caption===

फोटो - १४ सिन्नर कार संगमनेर-सिन्नर रस्त्यावर नांदूरशिंगोटे शिवारात जनावरांचे मांस घेऊन जाणारी हीच ती इनोव्हा कार. 

Web Title: Transport of animal meat from Innova car