धुळवडमध्ये बिबट्यांचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:11 IST2020-12-28T20:08:10+5:302020-12-29T00:11:55+5:30

सिन्नर: तालुक्यातील धुळवड येथील तरवडी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या भागात लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या आठवड्यात बिबट्या जेरबंद झाला असला, तरी या परिसरात आणखी तीन ते चार बिबटे असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Transmission of leopards in Dhulwad | धुळवडमध्ये बिबट्यांचा संचार

धुळवडमध्ये बिबट्यांचा संचार

ठळक मुद्दे शेतकरी भयभीत: आणखी चार बिबटे असल्याचा संशय

वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आणखी दोन पिंजरे लावले आहेत. तालुक्यातील धुळवड व चापडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळवड-पिंपळे रस्त्यालगत वसंत शिवराम आव्हाड यांची शेतजमीन व वस्ती आहे, तसेच तरवडी शिवारात आणखी काही कुटुंब वस्ती करून राहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील वसंत आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, बाजीराव आव्हाड, पंढरी आव्हाड आदींसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. रात्री-अपरात्री या भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याचा वावर वाढल्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
बिबट्यांच्या डरकाळ्यांनी नागरिक भयभीत
धुळवड परिसरात तीन ते चार बिबटे शेतकऱ्यांनी पाहिले होते. रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकायला येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, तालुक्याच्या नायगाव, म्हाळुंगी, भोजापूर खोऱ्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. काही भागांत शिकारीच्या शोधात मध्यंतरी बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचे हल्ले झाल्यानंतर वनविभागाकडून पिंजरे लावून त्यांना जेरबंद करण्यात आले.

Web Title: Transmission of leopards in Dhulwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.