शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारितेच्या प्रश्नपत्रिकेत भाषांतराची चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:42 IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या तिसऱ्या सत्रातील ‘मीडिया रिसर्च मेथड्््स’ म्हणजेच ‘माध्यम संशोधन पद्धती’ या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेमध्ये भाषांतराची गंभीर चूक झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या तिसऱ्या सत्रातील ‘मीडिया रिसर्च मेथड्््स’ म्हणजेच ‘माध्यम संशोधन पद्धती’ या विषयाच्या सोमवारी झालेल्या परीक्षेमध्ये भाषांतराची गंभीर चूक झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थी या प्रकारामुळे बुचकळ्यात पडले होते.माध्यम संशोधन पद्धती या तिसºया सत्रातील विषयाची परीक्षा नुकतीच पार पडली. मात्र प्रश्नपत्रिकेतील पहिल्याच प्रश्नात ‘कॉन्टिटेटिव्यू’ या शब्दाचे भाषांतर ‘गुणात्मक’ असे करण्यात आले होते. मात्र वास्तविक या शब्दाचा अर्थ ‘संख्यात्मक’ असे असणे गरजेचे होते. पहिल्याच प्रश्नात झालेल्या या चुकीमुळे विद्यार्थी काही वेळ गोंधळात पडले होते. इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींनी संख्यात्मक अर्थाने प्रश्नाचे उत्तर लिहिले असेल तर मराठी माध्यमाच्या परीक्षार्थींनी गुणात्मक अर्थाने उत्तर लिहिले असेल. मात्र सूचनेप्रमाणे इंग्रजी प्रश्नपत्रिका प्रमाण मानवी अशी सूचना करण्यात आली असल्याने इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींनी ‘संख्यात्मक’ अर्थाने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. जर त्यांनी मराठी प्रश्नपत्रिकेनुसार उत्तर लिहिले असेल तर ते चुकीचे ठरेल. २५ गुणांच्या या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न १५ गुणांचा असल्याने याविषयात उत्तीर्ण होण्यासाठी या प्रश्नाला गुण मिळणे गरजेचे आहे. यामुळे विद्यापीठाने या चुकीची दखल घेऊन ‘संख्यात्मक’ आणि ‘गुणात्मक’ अर्थाच्या उत्तरांना समान मानून उत्तरपत्रिका तपासल्या तर परीक्षार्थींचे नुकसान होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने याची दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ