शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:13 IST

११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा शिवसेना नेते राजेश गडाख, पंचायत समितीचे ...

११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व

देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा शिवसेना नेते राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सर्व ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. यावर्षी तीन पॅनलमध्ये लढत झाली. पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख, युवा नेते राजेश गडाख यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकत पंचायत समिती सदस्य विजय गडाख यांच्या ग्रामविकास पॅनल व पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथ गडाख यांच्या आपल्या पॅनलचा पराभव केला. प्रभाग क्रमांक एकमधून परिवर्तन पॅनलचे प्रशांत गडाख यांनी आपल्या पॅनलच्या भाऊसाहेब गडाख यांचा पराभव केला. याच वॉर्डातील अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव जागेतून आशा बर्डे यांनी आपल्या पॅनलच्या वंदना जाधव यांचा पराभव केला. इतर मागासवर्गीय महिला जागेतून अनुराधा गडाख यांनी मावळत्या सरपंच सुनीता गडाख यांचा पराभव केला. वाॅर्ड क्रमांक दोनमधून परिवर्तन पॅनलचे शरद गडाख यांनी आपल्या पॅनलच्या राजेंद्र गडाख यांचा व ग्रामविकास पॅनलचे सुखदेव गडाख, अपक्ष उमेदवार गणेश गडाख यांचा पराभव केला. महिला गटातून वनिता गडाख यांनी कविता गडाख यांचा पराभव केला, तर सुरेखा गडाख यांनी सुनंदा गडाख यांचा पराभव केला. वॉर्ड क्रमांक ३ मधून परिवर्तन पॅनलचे भालचंद्र घरटे यांनी ग्रामविकास पॅनलचे गणेश धरम यांचा पराभव केला तर महिला गटातून पुष्पा नरवडे यांनी ग्रामविकास पॅनलच्या पूजा गडाख यांना पराभूत केले. वॉर्ड क्रमांक चारमधून अनुसूचित जाती पुरुष गटातून वसंत दिवे यांनी ग्रामविकास पॅनलचे विल्यम शिंदे यांचा पराभव केला. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून राजेंद्र गडाख यांनी दौलत गडाख यांना पराभूत केले, तर सर्वसाधारण स्‍त्री राखीव गटातून वनिता गडाख यांनी रत्ना गडाख यांना पराभूत केले.

----------

देवपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने बाजी मारल्यानंतर पॅनलचे नेते राजेश गडाख यांना कार्यकर्त्यांनी असे उचलून जल्लोष केला. (२१ देवपूर)

===Photopath===

210121\21nsk_19_21012021_13.jpg

===Caption===

२१ देवपूर