अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:14 IST2020-01-20T23:33:08+5:302020-01-21T00:14:25+5:30
महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडणाºया अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आयुक्तसुरू करणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नगरसचिव विभागातील ९० कर्मचाºयांची यादीदेखील आयुक्तांनी मागविली असून, नगरसेवक आणि पदाधिकाºयांच्या लाडक्या अनेक कर्मचाºयांना बदल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
नाशिक : महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडणाºया अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आयुक्तसुरू करणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नगरसचिव विभागातील ९० कर्मचाºयांची यादीदेखील आयुक्तांनी मागविली असून, नगरसेवक आणि पदाधिकाºयांच्या लाडक्या अनेक कर्मचाºयांना बदल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने महापालिकेत अनेक कर्मचारी राजकीय दबावामुळे त्याच त्या विभागात ठाण मांडून बसतात. त्यांच्या बदल्या करण्यात अनेक अडथळे येतात. यापूर्वी अनेक आयुक्तांनी अन्यत्र बदल्या केलेले कर्मचारी पुन्हा त्यात त्या खुर्च्यांवरदेखील दाखल झाले आहेत. परंतु यंदा गमे यांनी बदल्यांचा धडाका लावण्याची तयारी केली असून, नगररचना विभागाकडून त्याची सुरुवात झाली आहे. आता अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर त्याचवेळी या कर्मचाºयांच्या याद्या तयार करण्यास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नगरसचिव विभागदेखील आयुक्तांच्या रडारवर असून, तेथील ९० कर्मचाºयांची यादी आयुक्तांनी मागविली आहेत. या विभागात वीस ते पंचवीस तर केवळ शिपाईच आहेत. काही पदाधिकाºयांना दोन ते तीन शिपाई देण्यात आले आहेत. काही गटनेते तर नावालाच असून, महासभेच्या एक दिवस अगोदर किंवा अपवादानेच महापालिकेत येणाºया या गटनेत्यांसाठीदेखील शिपाई आणि लिपिक अडकून पडले आहेत.
पाणीपुरवठा विभागाचा ताण कमी होणार?
महापालिकेत नगररचना आणि गटार योजनेसाठी मुबलक अभियंता नियुक्तकरण्यात आले आहेत, परंतु पाणीपुरवठ्यासाठी मात्र अभियंत्यांची टंचाई आहे. नगररचना आणि पाणीपुरवठा या दोन विभागांचा कार्यभार असेल तर संबंधित अभियंता नगररचना विभागाला अधिक प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे काहींकडे तर विभागीय अधिकारीपदाचादेखील कार्यभार आहे. आयुुक्तांच्या नव्या नियोजनात पाणीपुरवठा विभागावरील ताण कमी होणार काय याविषयी उत्कंठा आहे.
नियमानुसार नियोजन
महासभेच्या दिवशी पाणीवाटपासाठी मनुष्यबळ लागते यानिमित्ताने शिपाई नगरसचिव विभागातच कामास राहतात हे लक्षात आल्याने आयुक्तांनी महासभेच्या दिवशी सर्व खातेप्रमुख सभेत असल्याने त्यांच्या शिपायांचा या कामासाठी वापर करा असे सुचविल्याचे वृत्त आहे. काही पदाधिकाºयांकडे तर अतिरिक्तशिपाई आणि लिपिक असल्याने नियमानुसार आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवण्याचे नियोजन आयुक्तांनी केल्याचे वृत्त आहे.